Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha | Maharashtra News
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा, नावं सांगणार नाही, मात्र महिन्याभरात ही प्रक्रिया होईल, सामंतांचं वक्तव्य.
काँग्रेस संपली, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपला, मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येणार, जालन्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात रावसाहेब दानवेंची वक्तव्य.
स्वतःचा विचार करून शिवसेना दुसऱ्यांमध्ये शिरली, पण भाजप आपल्या विचारांशी पक्का, भाजप अशुद्ध झालाच कुठे? रोखठोकमधील संजय राऊतांच्या शुद्धीकरणाच्या टीकेला रावसाहेब दानवेंचं उत्तर.
हिंदुत्वाच्या नावाने भाजपने मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या,भविष्यात शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्याही जमिनी घेणार, आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीक
वक्फ बोर्डाच्या २ लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्यात, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल,
जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायण्याचा सरकारचा डाव, २०१४ ते २०२४ पर्यंतची सर्व सार्वजनिक संपत्ती विकून झाली, राऊतांचा आरोप